गलवान खोऱ्यात मारले गेलेल्या सैनिकांबाबत प्रश्न उपस्थित, चीनने तीन पत्रकारांना केली अटक


बीजिंग : गलवान खोऱ्यात (Galvan Valley) भारतीय सैन्याबरोबर झालेल्या झटापटीत चीनचे 45 सैनिक मारले गेले होते. मात्र यावर चीनकडून भाष्य करण्यात आले नव्हते. मात्र, चीनचे पाच सैनिक मारले गेल्याची बाब पुढे आली. त्यानंतर चीनचा खोटारडेपणा (China’s hypocrisy) पुन्हा एकदा जगासमोर आला. आता चीनने याप्रकरणी थयथयाट केला आहे. ही माहिती उघड करणाऱ्या तीन पत्रकारांवर चीनने कारवाई केली. 

गेल्या वर्षी पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीमध्ये (Galwan Valley) झालेल्या हिंसाचारात चार सैनिकांच्या मृत्यूला चीनने स्वीकारल्याबद्दल तीन चिनी ब्लॉगर्सनी प्रश्न उपस्थित केले आहेत. यानंतर चीनने कारवाई करत तिघांना अटक केली. एका माजी पत्रकारासह तीन ब्लॉगर्सनी म्हटले आहे की, या संघर्षात चार पेक्षा जास्त चिनी सैनिक मारले गेले होते, परंतु चीन सरकार (Chinese Government) याबाबत काहीही बोलण्यास तयार नाही. चिनी सरकारवर खोटेपणाचा आरोप करीत ब्लॉगर्सनी विचारले की, त्यांना पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात ठार मारण्यात आलेल्या सैनिकांची घोषणा करण्यास आठ महिने का लागले. चीनने तात्काळ त्याच्या शहीद सैनिकांविषयी जाहीर केले.

गतवर्षी जून महिन्यात लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांची जोरदार झडप झाली होती. या झटपेत 20 भारतीय जवान शहीद झाले होते तर चीनचे 40 पेक्षा जास्त सैनिक मारले गेले होते. मात्र, चीनकडून मात्र त्यांचे नेमके किती जवान मारले गेले, हे कधीच जाहीर केले नव्हते.अखेर 8 महिन्यांनी चीनच्या ग्लोबल टाईम्स या सरकारी वृत्तपत्राने गलवानमध्ये एका अधिकाऱ्यासह 5 सैनिक मारले गेल्याचे म्हटले होते.  

त्यानंतर अनेकांकडून प्रश्नांची सरबती होऊ लागली. त्याचवेळी पँगाँग टीएसओ सरोवराच्या परिसरातून माघार घेतली होती. यामुळे चीनला मायदेशात अनेक प्रश्नांची उत्तर द्यावी लागत आहेत. गलवान खोऱ्यात झालेल्या झडपेबद्दल चीनच्या अधिकृत भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या तीन पत्रकारांविरुद्ध कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. शोध पत्रकार शू झिमिंग यांना शनिवारी नानजिंगमधून अटक करण्यात आली. त्यामुळे चीन पुन्हा एकदा बिथरल्याचे दिसून येत आहे.

गलवान खोऱ्यातील संघर्षाबद्दल चीनच्या लष्कराने शुक्रवारी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या पाच सैनिकांना सन्मान घोषित केला. पुरस्कार प्राप्त चार सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर कमांडर दर्जाचा एका अधिकारी गलवान संघर्षात जखमी झाला आहे. असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. तसेच चीन सरकारने मृतांची जी संख्या जाहीर केलीय, त्यावर शू झिमिंग यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. 

चीनमधल्या ब्लॉगर्सनी सुद्धा चिनी सरकारचा दावा मान्य करण्यास नकार देत, जास्त जिवीतहानी झाल्याचे म्हटले आहे. भारताने आपले सैनिक शहीद झाल्याचे लगेच मान्य केले, मग चीनला हीच गोष्ट मान्य करण्यासाठी आठ महिने का लागले? असा सवाल शू झिमिंग यांनी उपस्थित केला. रविवारी बिजींगमध्ये पत्रकाराला याच कारणामुळे अटक करण्यात आली आहे.  

दरम्यान, जगभरातील अनेक देश, रशियाची ‘तास’ ही मीडिया एजन्सी चीनचे किमान 45 सैनिक मारले गेल्याचे सांगत असताना केवळ 5 जण ठार झाल्याचे सांगून लपवाछपवी सुरूच ठेवली आहे. या वृत्तपत्राने झटापटीचा एक व्हिडिओदेखील जारी केला आहे. या व्हिडीओत दिसणारा क्युई फबाओ हा रेजीमेंट कमांडर गलवानमध्ये मारला गेल्याचा दावा ‘ग्बोबल टाइम्स’ने केला आहे. 

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

English English हिन्दी हिन्दी मराठी मराठी
error: Content is protected !!