यावर्षी IPL चा भाग नसणं लाजिरवाणी गोष्ट, बोली न लागल्याने हा खेळाडू निराश


मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा 14 वा हंगाम यावर्षी एप्रिलमध्ये होणार आहे. गुरुवारी चेन्नई येथे ही स्पर्धा होण्यापूर्वी खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिसला सर्वाधिक 16.25 कोटींच्या बोलीसह खरेदी करण्यात आले. त्याचवेळी इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉयसाठी कुठल्याही संघाने बोली लावली नाही. न विकल्या गेल्यानंतर रॉयने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली.

इंग्लंड क्रिकेट संघाचा मर्यादित षटकांचा सलामीवीर फलंदाज जेसन वादळपूर्ण खेळीसाठी ओळखला जातो. मागील हंगामात दिल्ली कॅपिटल संघाचा सदस्य असलेल्या या फलंदाजाने वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. जेसनच्या जागी डेनियल सॅम्सचा दिल्ली संघात समावेश होता. यावर्षीच्या लिलावापूर्वी जेसनला दिल्ली संघाने रिलीज केले होते.

गुरुवारी 1 कोटी बेस प्राईस असलेल्या जेसनचा लिलावात समावेश होता. पण कोणत्याही संघाने त्याला खरेदी करण्यासाठी रस दाखविला जात नव्हता. कोणत्याही संघाकडून बोली न लागल्याने जेसनने निराशा व्यक्त केली.

जेसनने ट्विटरवर लिहिले की, यावर्षी आयपीएलचा भाग न होणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. यावर्षी निवडलेल्या सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करू इच्छित आहे. विशेषत: त्या काही लोकांना ज्यांची येथे जास्त बोली लागली. आता त्यांना पाहण्यास खूप मजा येईल.’

कोरोनामुळे गेल्या वर्षी आयपीएलचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं होतं. पण यंदा आयपीएलचं आयोजन हे भारतातच होणार आहे. बीसीसीआयने यासाठी जय्यत तयारी केली आहे. 

ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तो 16 कोटी 25 लाखांना विकला गेला आहे. त्याला राजस्थान रॉयल्सने विकत घेतले आहे. मॉरिसने युवराज सिंगचा विक्रम मोडला आहे. युवराजला याआधी 16 कोटींना खरेदी केले गेले होते.

ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू Jhye Richardson ला  Punjab Kings ने 14 कोटींना खरेदी केले. त्याची बेस प्राईस 1.50 कोटी होती. 

ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेलसाठी विक्रमी बोली लावली जात आहे. आरसीबीने बाजी मारली. फ्रँचायझीने त्याला 14.25 कोटीमध्ये खरेदी केले आहे. मॅक्सवेलला विकत घेण्यासाठी आरसीबी आणि सीएसकेमध्ये चढाओढ झाली.

Kyle Jamieson ला Royal Challengers Bangalore ने तब्बल 15 कोटींना खरेदी केले.

कोरोनामुळे गेल्या वर्षी आयपीएलचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं होतं. पण यंदा आयपीएलचं आयोजन हे भारतातच होणार आहे. बीसीसीआयने यासाठी जय्यत तयारी केली आहे. 

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

English English हिन्दी हिन्दी मराठी मराठी
error: Content is protected !!