Dhanashri Kadgaonkar shared her baby boy first photo


मुंबई : सगळ्यांची लाडकी राणादाची वहिनी आणि मराठमोळी अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. धनश्रीने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म देत आहे. लॉकडाऊनच्या काळात गरोदर राहिलेल्या धनश्रीने आपल्या गरोदरपणाचा काळ खूप एन्जॉय केला. धनश्रीने नुकताच आपल्या मुलाचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

धनश्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर आपल्या बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे. यामध्ये धनश्रीने आपल्या हातात चिमुकल्याचे गोंडस असे नाजूक पाय धरले आहे. अनेकदा बाळाचे अगदी लहानपणीचे फोटो शेअर करायचे नसतात. तसाच फोटो धनश्रीने शेअर केला आहे. यामध्ये बाळाचा चेहरा दिसत नाही. 

धनश्रीच्या घरी २९ जानेवारीला छोट्या चिमुकल्याचे आगमन झाले आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. तिचे बाळ आणि ती सुखरुप असल्याचे धनश्रीने या पोस्टमध्ये म्हटले आहे. धनश्रीने दिलेल्या गोड बातमीने तिच्या चाहत्यांनी तिला अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अनेक सेलिब्रेटींनीही धनश्री आणि तिच्या बाळाला शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले आहेत.

धनश्री सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. तिने गरोदरपणात आपल्या प्रत्येक गोष्टी शेअर केला होता. त्याच प्रमाणे गरोदर असल्याची गोड बातमी देखील तिने एका व्हिडिओतून शेअर केला होता. कुणी तरी येणारं गं म्हणत हा व्हिडिओ तिने आपल्या नवऱ्याच्या वाढदिवसादिवशी शेअर केला होता. 

‘माझिया प्रियाला प्रित कळेना’ या मराठी मालिकेतून धनश्रीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्यानंतर ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘जन्मगाठ’ या मालिकेतूनही धनश्री प्रेक्षकांसमोर आली होती. मात्र, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून धनश्री घराघरात पोहचली. तिची ‘वहिनीसाहेब’ ही भूमिका चांगलीच गाजली. मालिका विश्वात सक्रिय असतानाच 2013मध्ये धनश्रीने दुर्वेशसोबत लग्नगाठ बांधली. 

 

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

English English हिन्दी हिन्दी मराठी मराठी
error: Content is protected !!