Kareena Kapoor Khan with New Born Baby Boy reached at Home


मुंबई : करीना कपूर खानने (Kareena Kapoor Khan)  रविवारी 21 फेब्रुवारी रोजी दुसऱ्या मुलाला जन्म दिला. याबाबत सैफने माहिती देताना सांगितलं की,’करीना आणि बाळं दोघं ही सुखरूप आहेत’. करीनाच्या मुलाचा जन्म ब्रीच कँडी रुग्णालयात झाला आहे. आज करीना आणि तिच्या बाळाला डिस्चार्ज मिळाला असून ती घरी पोहोचली आहे. 

ब्रीच कँडी रुग्णालयातून करीना कपूर खान तान्ह्या बाळासह सैफ अली खान आणि त्यांचा मुलगा तैमूर घरी घेऊन आले आहेत. सैफ आणि तैमूर गाडीच्या पहिल्या सीटवरच बसले होते. तर मागच्या बाजूला करीना आणि बाळ दोघेही दिसले. 

या व्हिडिओत करीनाने मीडिया आणि फोटोग्राफरला पाहून बाळाच्या चेहऱ्यावर आपली ओढणी टाकली. यामुळे बाळाचा चेहरा कोणत्याच फोटोत आणि व्हिडिओत दिसला नाही. 

करीना कपूर खानला शनिवारी रुग्णालयात सायंकाळी 5.30 च्या सुमारास दाखल करण्यात आलं. रविवारी करीनाने सकाळी 8.30 च्या सुमारास बाळाला सी-सिक्सेनच्या माध्यमाद्वारे जन्म दिला. करीनाने दुसऱ्यांदा बाळाला जन्म दिला आहे. 

सैफ अली खानसोबतच करीनाचे वडिल अभिनेता रणधीर कपूर यांनी बाळाच्या आरोग्याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की,’करीना आणि त्यांच्या बाळाची तब्बेत उत्तम आहे. मी खूप आनंदी आहे. पुन्हा एकदा मी आजोबा झालो आहे. मी चिमुकल्या बाळाला भेटण्यासाठी आतुर आहे.’

रणधीरने म्हटलंय की,’तैमूर देखील मोठा भाऊ होण्याच्या आनंदात आहे. तो खूष आहे की त्याला एक भाऊ मिळाला आहे.’ तसेच बाळाच्या आगमनाने सगळेच आनंदी आहेत.  

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

English English हिन्दी हिन्दी मराठी मराठी
error: Content is protected !!