Manasi Naik shared Good News one month after marriage with Pradeep Kharera


मुंबई : अभिनेत्री मानसी नाईकने नुकतंच अनेक दिवसांपासून डेट करत असलेल्या बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर हे दोघं हनीमूनला परदेशात न जाता थेट प्रदीपच्या गावी म्हणजे फरीदाबादला गेले. या ठिकाणचे अनेक व्हिडिओ मानसीने सोशल मीडियावर शेअर केलेत. असाच एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे ज्यामध्ये तिने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. 

एक महिना लग्नाला होताच शेअर केलेल्या या म्युझिक अल्बममुळे मानसी आणि प्रदीप चर्चेत आहेत. हीच या दोघांची लग्नानंतरची गुड न्यूज आहे. या व्हिडिओ मानसीने म्हटलंय की,’लग्न होऊनी महिना झाला ऋतू बहरला, वाटेवर मोगरा अमलला अन् दरवळला. मनी मानसी डोळ्यांमध्ये भाव उतरले, प्रदीप झाले अवघे जगणे आणि उजळले.’

Engaged Future Mrs. Kharera म्हणतं तिने आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. मानसीचा होणारा नवरा प्रदीप खरेरा हा बॉक्सर आहे. या दोघांचा मुंबईत काल साखरपुडा झाला. मानसीनं गेल्या वर्षीच म्हणजे 2020 साली आपल्या रिलेशनशिपमध्ये सर्वांना सांगितलं होतं. आपल्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी तिनं आपलं प्रेम व्यक्त केलं.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

English English हिन्दी हिन्दी मराठी मराठी
error: Content is protected !!