अनुराग कश्यपच्या सिनेमाला अवार्ड दिला तर करण जौहर का भडकला होता…


मुंबई : सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझम आणि OuterS vs inner हा वाद तीव्र झाला होता. यावेळी, ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी बॉलिवूडच्या काळ्या पडद्यांवर प्रकाश टाकला होता. त्यांनी आपल्या ‘नॅशनल इंट्रेस्ट’ या कॉलमध्ये आपल्या अनुभवांच्या आधारांवर बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, बॉलिवूड पुरस्कार मिळवण्यासाठी कोण किती वाईट थराला जावू शकतं याचं वर्णन त्यांनी या कॉलमध्ये केलं आहे.

शाहरुखचा ‘माय नेम इज खान’ हा चित्रपट २०१० साली प्रसिद्ध झाला होता. मात्र, २०११च्या स्क्रीन अवॉर्ड्समध्ये या चित्रपटाची निवड कोणत्याही पुरस्कारासाठी झाली नव्हती. शेखर गुप्ताही या पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांनी लिहिलं आहे की, सर्व तयारी पूर्ण झाली होती. कुणा-कुणाला पुरस्कार द्यायचा याचा निर्णय झाला होता. अभिनेते अमोल पालेकर हे ज्युरीचे हेड

मात्र, ही यादी बाहेर आल्यावर करण जोहरच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाचं नाव या यादीत समाविष्ट झालं नव्हतं. हे पाहून करण जोहर खूप भडकला होता. तो म्हणाला की, ‘अनुराग कश्यपचा कमी बजेट ‘उड़ान’ हा सिनेमा निर्णायक मंडळांनी निवडला कसा? तो म्हणाला या कार्यक्रमात आपल्या सिनेमाचा उल्लेख न केल्यास मी आणि शाहरुख या कार्यक्रमाला बॉयकॉट करु’

वडिलांची ईज्जत केली नाही तर हा पुरस्कार कसा घेवू
शेखर गुप्ता यांनी आणखी एक किस्सा शेअर केला आहे. त्यांनी लिहिलं होतं की, 2007 मध्ये हृतिक रोशनला क्रिश चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळणार होता. त्याला स्टेजवर पफॉर्मन्स सादर करण्याचा करारही करण्यात आला होता. मात्र, अचानक हृतिकने हा पुरस्कार घेण्यास नकार दिला. तो म्हणाले की, ‘आपण पफॉर्मन्स देवू, पण पुरस्कार घेणार नाही.

हृतिकने याचं कारण स्पष्ट केलं आणि म्हणाला, ज्या जूरीने माझ्या वडिलांना ईज्जत दिली नाही, जे चित्रपटाचे दिग्दर्शक होते. तो पुरस्कार मी कसा घेवू शकेन.. मात्र, नंतर हृतिक हा पुरस्कार स्विकारला. पण पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या पार्टीला हृतिकने बायकॉट केलं 

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

English English हिन्दी हिन्दी मराठी मराठी
error: Content is protected !!