lisa haydon is nervous before welcoming her third baby soon know why


मुंबई : लिसा हेडॉन तिच्या गरोदरपणाचा आनंद घेत आहे. ती कायमच तिच्या बेबी बंपसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिनं बेबी बंपसहचा एक नवा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिनं तिच्या छोट्या मुलाला आपल्याकडेवर घेतलं आहे. या फोटोमध्ये लिसा भगव्या रंगाच्या बिकीनीमध्ये दिसत आहे.. यांत तिचा बेबी बंप दिसत आहे. मात्र लिसा यावेळी प्रेग्नंसीसाठी थोडी नरवस आहे.

हा फोटो शेअर करत लिसाने दिलंल कॅप्शन पाहून सध्या तिचे चाहते भारावून गेले आहेत लिसाने कॅप्शनमध्ये लिहलंय की, लिसाने फोटो शेअर केला आहे आणि लिहिलं आहे की, ”तुमचं एक बाळ आधीच तुमच्या मांडीवर असताना दुसरं येणाऱ्या बाळांबद्दल इतरदेखील माझ्याप्रमाणेच स्त्रिया चिंताग्रस्त आहेत का?

मला त्या स्त्रियांच्या भावना समजत आहेत. त्याला कसं वाटेल जेव्हा तो आत्ताच कुठे बोलायला शिकत आहे त्याला कसं वाटेल? लहान मुल आपल्यावर खूप प्रेम करतात आणि तेव्हा पण करतील जेव्हा 10 आठवड्यांत त्याची बहिण घरी येईल”

हाँगकाँगमध्ये समुद्रावर एन्जॉय करताना लिसा म्हणाली की, ‘लॉकडाऊन दरम्यान समुद्रकिनारे खुप  सुंदर दिसत होते. एप्रिल महिन्यात मला समुद्रावर जायला खूप आवडतं. पाणी कोमट, सूर्य पण जास्त तापत नाही आणि या दरम्यान जास्त प्रमाणात गर्दी पण नसते. लिओला देखील मजा येत आहे. त्याला आधीपासूनच पाणी खूप आवडतं. कदाचित लवकरच तोही स्विमर होईल.’

कृपया सांगा की लिसाने ऑक्टोबर २०१६ मध्ये डिनो लालवाणीसोबत लग्न केलं. यानंतर, 2017मध्ये लिसामे जॅकला जन्म दिला. हे दोघंही जॅकचे पालक बनले. त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये हे दोघेही दुसर्‍या मुलाचे पालक झाले आणि आता यावर्षी ते दोघेही तिसऱ्यांदा पालक होणार आहेत

तिसऱ्यांदा प्रेग्नंसीची घोषणा देत लिसाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये लिसा म्हणाली “आळशीपणामुळे मी माझ्या चाहत्यांना गरोदरपणाविषयी माहिती देऊ शकले नाही. जॅकी, काय तु सांगू शकतोस का की मम्मीच्या टम्मीमध्ये काय आहे? ‘

त्यानंतर जॅक म्हणतो, ‘बेबी सिस्टर.’ लिसा पुढे म्हणाली की, ती खूप एक्साइटेड आहे. 3 जून रोजी ती आई बनणार असल्याचेही लीझाने यावेळी सांगितलं.

लिसा हाँगकाँगमध्ये आपल्या कुटुंबासह राहते. लिसा ‘ऐ दिल है मुश्किल’, ‘क्वीन’ आणि ‘हाऊसफुल 3’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती बऱ्यांच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

English English हिन्दी हिन्दी मराठी मराठी
error: Content is protected !!