when mohammed rafi transform his driver life by fire him out of job annu kapoor shares interesting story


मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमोल पालेकर हे 80 वर्षांचे आहेत. यांच्या ८०व्या वाढदिवसा निमित्त लोकप्रिय म्यूजिक रिएलिटी शो सा रे गा मा पा लिटिल चँम्पमध्ये अन्नू कपूर  हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील जुन्या आठवणींना उजाळा  दिला होता. यावेळी स्पर्धकांनी त्यांच्या गाण्यांनी सगळ्यांना मंत्रमुग्ध तर केलंच. पण त्याचवेळी सोबत अन्नू कपूर यांनी असे काही रंजक रहस्य आणि किस्से सांगितले ज्यामुळे जुनी गाणी आणि गायकांच्या चाहत्यांना आश्चर्य जरुर वाटलं असेल.

शूटिंग दरम्यान टॉप ७ लिटल चॅम्प्सच्या परफॉरमन्स दरम्यान मोहम्मद रफी यांना जोडलेली एक मनोरंजक किस्सा अन्नू कपूर यांना आठवला होता. माधव अरोरा नावाच्या स्पर्धकाने रफी जी यांचं ‘बार बार देखो’ चित्रपटातील  ‘परदेसी से ना अंखियां मिलाना’ हे गाणे गायलं. त्याचं गाणं ऐकल्यानंतर अन्नू कपूर यांनी एक जुनी गोष्ट सांगितली.

जेव्हा रफी साहेब यश आणि प्रसिद्धीच्या दिशेने जात होते तेव्हा त्यांनी नोकरीवरून काढून त्यांचा ड्रायव्हर सुलतानचं जीवन बदलून टाकायला सुरुवात केली होती

अन्नू कपूर यांनी सांगितला किस्सा
या घटनेची आठवण करून देत अन्नू कपूर म्हणाले, ‘मोहम्मद रफी एक असाधारण गायक होता. ज्यांचा आवाज रेशमासारखा गुळगुळीत होता. यामुळे त्यांची गाणी ऐकल्यावर खूप आनंद मिळायचा. या आवाजाने त्यांना खूप यश, प्रसिध्दी, अफाट संपत्ती मिळाली त्यानंतर रफी साहब यांनी अमेरिकेतून इंपोर्टेड कार खरेदी केली.’

पुढे अन्नू कपूर म्हणाले, मात्र ”नवीन कारला घेवून एक अडचण होती, अमेरिकेतील वाहनांना ड्राईव्हरच्या उजव्या बाजूला स्टेरिंग असतं आणि रफी साहेबांचा चालक सुलतान याला उजव्या साईडने गाडी कशी चालवायची हे माहित नव्हतं, म्हणून त्यांनी सुलतानला नोकरी वरुन काढून टाकलं. त्यांनी पुन्हा ड्राईव्हरचा शोध सुरु केला. जो उजव्या हाताची कार चालवू शकेल.

रफी साहब यांना नवीन ड्रायव्हर मिळाला, परंतु जुन्या ड्रायव्हर सुलतानला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये याची काळजीही त्यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी 70 हजार रुपयांची टॅक्सी विकत घेतली आणि स्वत: चा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी त्याला दिली. मोहम्मद रफी यांनी टॅक्सी दिल्यानंतर सुलतान भाईकडे आता स्वत:च्या 12 टॅक्सी आहेत.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

English English हिन्दी हिन्दी मराठी मराठी
error: Content is protected !!